Rational Emotive Behavioural Therapy [ REBT ]

ही थेरपी Cognitive Behaviour Therapy चा एक प्रकार असून Albert Ellis यांनी विकसित केली आहे REBT नुसार प्रत्येकजण स्वतःविषयी काही Assumption बाळगून असतो या Assumption वर आपल्या जीवनाची दिशा ठरते आणि विविध घटनांना आपण त्यानुसार सामोरे जातो. पण दुर्दैवाने काही लोकांचे Assumption अवास्तव असतात . या अवास्तव अपेक्षांमुळे , अपेक्षाभंगाचे दुखः आणि अपूर्णत्वाची(depression) भावना निर्माण होते.

Activating event (A), Belief(B) आणि Consequences (C) हे थेरपी चा पाया आहेत .

A: म्हणजे अशी घटना जी नकारात्मक विचार निर्माण करते.

B: म्हणजे प्रत्यक्षातले नकरात्मक विचार आणि

C: म्हणजे आपले वागणे

हे A, B, C आपला जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन (Attitude) ठरवतात

REBT नुसार Activating event(A) नकारात्मक विचारांना कारणीभूत नसून, आपल्या अवास्तव कल्पनांमुळे या घटना चुकीच्या पद्धतीने interpret केल्या जातात, जे आपली Belief सिस्टम बनवतात आणि त्याचे परिणाम कृतीत Consequences दिसतात. REBT Hypnotherapy हिप्नो थेरपीचा वापर करून Subconscious Mind मधून अवास्तव अपेक्षा दूर करून सकारात्मक सूचनांच्या (Positive suggestion ) सहायाने जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो.